![]() |
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना कालकुंद्री संघाचे खेळाडू |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 'एक गाव एक संघ' या महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धेत चंदगड तालुका व परिसरातील दिग्गज ३२ संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामना श्री कलमेश्वर स्पोर्ट क्लब कालकुंद्री विरुद्ध यजमान राजगोळी बुद्रुक संघादरम्यान झाला. या सामन्यात कालकुंद्री संघाने ३५ धावांनी दणदणीत विजय मिळवत रोख बक्षीस रुपये ३२ हजार व आकर्षक चषक पटकावला. कालकुंद्री संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार व सामनावीर विनायक कांबळे यांच्या ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर आठ षटकात ९३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल राजगोळी संघाला आठ षटकात केवळ ५८ धावांपर्यंत मजल मारता आली. विजयी संघातील विनायक कांबळे, विक्रम पाटील, दिनकर पाटील, अमरदीप कांबळे, भाऊराव पाटील, रवी पाटील, गौरव पाटील, इराप्पा पाटील, अजिंक्य तेऊरवाडकर, मनोज पाटील, राहुल पाटील, अमन मोमीन, अजित भातकांडे, अजित पाटील आदींनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment