चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२५' स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी इंडॉल क्रीडांगण (बेळगाव वेंगुर्ला हायवे हिंडगाव फाटा नजीक) येथे चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश वामन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
स्पर्धा उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी चंदगड पोलीस विरुद्ध कृषी विभाग चंदगड या संघांमध्ये झालेल्या लढतीत पोलीस टीमने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत सहा षटकात 63 धावा फटकावल्या या प्रतिउत्तरा दाखल कृषी विभागाची टीम सहा षटकात केवळ 30 धावा करू शकली यामुळे पोलीस टीम ने 33 धावांनी विजय मिळवला यावेळी झालेल्या दुसऱ्या सामन्यात एलआयसी इंडिया टीमने एचडीएफसी बँक टीमचा पराभव केला. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे एचडीएफसी बँक केला सहा षटकात 27 धावा पर्यंत मजल मारता आली प्रत्युत्तर दाखल या धावा एलआयसी संघाने चौथ्या शतकात पूर्ण करून विजय संपादन केला. दोन्ही सामन्यांची नाणेफेक प्रो कबड्डी चे दबंग बाहुबली कबड्डीपटू चंदगड तालुक्याचा अभिमान सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या आधी स्पर्धेचे उद्घाटन दिवानी व फौजदारी सहन्यायाधीश वामन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक श्री. मुल्ला, राज्य परिवहन महामंडळ चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, कृषी सहाय्यक निवृत्ती भगत, रेंजर नंदकुमार भोसले (चंदगड), ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र पाटील व डॉ. हासुरे, आरोग्य सहाय्यक रवी पाटील यांच्यासह सर्व तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच बेळगावचे उद्योजक व वृद्धाश्रम चालक विजय पाटील चंदगड येथील उद्योजक सुनील काणेकर, प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई व सुरज देसाई यांचे वडील शिरीष देसाई मुख्याध्यापक ल. पुं. बामणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, तालुका आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोबे, तालुका कृषी अधिकारी विजय गमदारे, प्रशांत आवळे (पाटणे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे इफ्तिकार मुल्ला यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक पुढारी चे पत्रकार श्रीकांत पाटील यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांनी केले. यावेळी न्यायाधीश वामन जाधव, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व प्रो कबड्डी स्टार सिद्धार्थ देसाई आदींनी मनोगते व्यक्त केली. पत्रकार संघाचे खजिनदार सी एल न्यूज चॅनेलचे संपादक व क्रिकेट स्पर्धा विभाग प्रमुख संपत पाटील यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य चेतन शेरेगार, राहुल पाटील, संजय केदारी पाटील, संजय मष्णू पाटील, नंदकुमार ढेरे, सागर चौगुले, संदीप तारीहाळकर, राजेंद्र शिवणगेकर, संस्थापक अनिल धुपदाळे, उदय कुमार देशपांडे, उत्तम पाटील, ज्योतिबा पाटील, सचिन तांदळे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नंदकिशोर गावडे यांनी केले.
पुढील सामने येत्या शनिवारी व रविवारी दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली.
पत्रकार चषक ऑफिसर्स लिग 2025* मधील सहभागी संघ
1.पत्रकार
2.पोलीस
3.एसटी
4.कृषी विभाग
5.महावितरण
6.वन विभाग
7.तहसिल कार्यालय
8.आरोग्य विभाग
9.पीडब्ल्यूडी
10.नगरपंचायत
11.एलआयसी
12.प्राध्यापक वॉरियर्स
13.माध्यमिक शिक्षक
14.बँक व पतसंस्था
15.कृषी सेवा केंद्र
16.महा ई सेवा
17.न्यायालय
18.पंचायत समिती
19.सेवानिवृत्त शिक्षक
20.एच. डी. एफ. सी. बँक
No comments:
Post a Comment