शिनोळी बुद्रुक शाळा समुहनृत्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2025

शिनोळी बुद्रुक शाळा समुहनृत्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

 

कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना शिनोळी बुद्रुक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेत्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड तालुकयाचे प्रतिनिधीत्व करीत विद्यामंदिर शिनोळी बुद्रुक (केंद्र मजरे कार्वे) शाळेच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी राज्याचे चिरमी हे लोकनृत्य समूह नृत्य सादर करुन कनिष्ठ गटातील  प्रथम क्रमांक पटकाविला.

    या नृत्याकरीता चंदगडचे  गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, केंद्रप्रमुख बाळू प्रधान यांचे प्रोत्साहन लाभले. तर मुख्याध्यापक आप्पाराव पाटील, अंजना पाटील, शामला पाटील, संजय काळे, सुभाषचंद्र सावंत, प्रल्हाद गावडे, चंदा घसारी, मनिषा पावशे, संजीवनी गिऱ्यालकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

       शाळेच्या या यशात वादक सुनील कांबळे, पालक तसेच शा.व्य. समितीचे अध्यक्ष नारायण बेळगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर मेणसे,  शिक्षणतज्ञ पांडुरंग बोकमुरकर व सर्व सदस्य, सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या यशाबदल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment