बेळगाव येथील स्पर्धेत जलतरणपटू भगतसिंग गावडे ने पटकावली सात पदके - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2025

बेळगाव येथील स्पर्धेत जलतरणपटू भगतसिंग गावडे ने पटकावली सात पदके

 

बक्षिसे व प्रशिक्षकां सोबत जलतरणपटू भगतसिंग भारत गावडे

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   बेळगाव येथील आबा हिंद स्पोर्ट्स क्लब क्रीडा भारती तर्फे भरवण्यात आलेल्या आंतरराज्य स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये  भगतसिंग भारत गावडे याने विविध प्रकारात चार गोल्ड आणि तीन सिल्व्हर अशी ७ पदके पटकावली.

    50 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल. 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड मेडल. 50 मीटर बॅकस्टोक गोल्ड मेडल, 100 मीटर IM गोल्ड मेडल, 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर मेडल, रिले मध्ये दोन सिल्वर मेडल पटकावली. त्याला प्रमाणपत्र, मेडल, तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप देवून गौरविण्यात आले.

    भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये तब्बल 40 हुन अधिक सुवर्ण पदके मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेत चौथीत शिकत असून के.एल.ई. स्विंमर्स क्लब बेळगांव  मध्ये प्रशिक्षण घेत आहे.  

No comments:

Post a Comment