शाहीर बाजीराव पाटील (कालकुंद्री) व कलापथक कागणी (संग्रहित छायाचित्र)
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
युगपुरुष कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त कालकुंद्री, ता. चंदगड येथे दि १९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता किल्ले गंधर्वगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत. सकाळी ९ वाजता लेझीम, बेंजो व पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा मिरवणूक. दुपारी १२ वाजता शिवप्रतिमा व अश्वारूढ शिव पुतळ्याचे पूजन. या नंतर विविध महत्त्वाच्या परीक्षा पास झालेले गावातील विद्यार्थी, पोलीस दलात निवड झालेले सैनिक, अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर व समाजसेवक यांचा विशेष सन्मान आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता शिवशाहीर बाजीराव पाटील (कालकुंद्री) व शाहिरी कलापथक कागणी यांच्या शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांना शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment