चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
जेलुगडे (ता. चंदगड) येथे श्री सातेरी भावई देवी यात्रेनिमित्य सालाबाद प्रमाणे रविवार दि. २३/०२/२०२५ रोजी महादेव गावस लिखित 'गर्जले सह्याद्रीचे कडे' हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाची यशोगाथा विशद करणारे ऐतिहासिक नाट्यपुषप' सादर होणार आहे.
या महानाट्यातील कलाकार पात्र परिचय पुढीलप्रमाणे -
शिवाजी महाराज - शशिकांत तानाजी गावडे, नेताजी पालकर - महेश नरसु गावडे, बहिर्जी नाईक- दीपक मोहन गावडे, शिवा काशीद- जकोबा धाकलू गावडे, बाजीप्रभू- एकनाथ पुंडलिक गावडे, जिवा महाले- जकोबा गावडे, जिवबा- अशोक दत्तू चव्हाण, सूर्याजी सुर्वे- श्रीपती दत्तू चव्हाण, अफजल खान- एकनाथ पुंडलिक गावडे, सय्यद बंडा- श्रीपत चव्हाण, सिद्धी जौहर- एम बी गाडेकर, फाजल खान- परशुराम गुंडू नार्वेकर, सुरूर खान- सुहास मनोहर गावडे, बकुळा- मोहिनी खोत (सिने अभिनेत्री सांगली), नेपथ्य व वेशभूषा- रतन आर्ट्स बेळगाव, पार्श्व संगीत- म्युझिकल पार्टी सांगली, दिग्दर्शक- एल आर गावडे, निर्माता- मोहन कृष्णा गावडे.
चव्हाटा देवालय नजीक होणाऱ्या या नाट्य प्रयोग उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड नामदेव गावडे हे असून यावेळी गावातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी शिवप्रेमी व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन यात्रा कमिटी जेलुगडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment