मुंबई - विशेष वृत्तसेवा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी भागलपुर (बिहार) येथून वितरित करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दिवसेनदिवस या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र सद्या काही जाचक अटी असल्यामुळे कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. हा हप्ता राज्यातील सुमारे ८८ लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ई-केवायसी किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
No comments:
Post a Comment