दसरा चौक गडहिंग्लज येथे विज बिलांची होळी करताना शेतकरी बांधव.
गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
विद्यमान महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी साडेसात हॉर्सपॉवरच्या विद्युत मोटर पंपधारक शेतकऱ्यांची वीज बिले माफ केल्याची घोषणा केली होती. सत्तेवर आल्यानंतर मात्र या घोषणेचा या सरकारला विसर पडला असून साडेसात हॉर्सपॉवर विद्युत मोटरपंप धारक शेतकऱ्यांना नेहमी प्रमाणे वीज बिले पाठवली आहेत. ही बिले वसूली साठी पाठवून शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे. याबद्दल मोटर पंप धारक शेतकऱ्यांत संताप उसळला असून याचा आज मंगळवार दि १८/०२/२०२५ रोजी गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दसरा चौक गडहिंग्लज येथे वीज बिलाची होळी करुन निषेध केला. या वेळी वीज ग्राहक संघर्ष समिती चे पदाधिकारी व तिन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment