चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या बागीलगे येथील श्रमसंस्कार शिबिराची १८/०२/२०२५ रोजी सांगता झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून युवकांवर उत्तम संस्कार होतात या संस्काराच्या शिदोरीचा उपयोग विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यामध्ये करावा असे आवाहन त्यांनी केले."
बागीलगे (ता. चंदगड) राष्ट्रीय सेवा योजनेच्या संस्कार शिबिराचा शुभारंभ ५ फेब्रुवारी रोजी झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. डी. गोरल होते. श्रमदान शुभारंभ बागीलगेचे सरपंच नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था या विषयावर बोलताना ॲड. विजय कडुकर यांनी कायद्याबाबतची माहिती दिली. सर्वांनी कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी ॲड. आर. पी. बांदिवडेकर होते. महिलांचे आरोग्य आणि समस्या या विषयावर प्रा. वंदना कालकुंद्रीकर, प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ. संपदा गुरव होत्या. यावेळी हळदीकुंकू चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र या विषयावर कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवड व कृषी सहाय्यक सुधाकर मुळे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी शेतीविषयक वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस. आर. पाटील होते. पशु चिकित्सा शिबिर घेऊन गावातील व परिसरातील जनावरांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी पशुधन काळजी या विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. गजानन कापरे व डॉ. सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सदानंद पाटील उपस्थित होते. "युवकासमोरील आव्हाने व व्यसनमुक्ती" या विषयावर राज्य विक्रीकर निरीक्षक गोपाळ पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष एस. एस. आवडण होते. विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. के. पाटील, प्रा. सरोजिनी दिवेकर, प्रा. आर. एस. पाटील, परसू भरमगावडा, पी. पी. धुरी, श्रीनिवास पाटील पाटील यांच्या कमिटीमार्फत बागिलगे येथे राबवण्यात आलेल्या या श्रमसंस्कार शिबिराला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी गावातील विविध कामांचे नेटके नियोजन करून ग्रामस्वच्छता, पाणी व्यवस्थापन, पानंद रस्ते, स्वच्छतेचे महत्व, काजू बाग लागवडीचे महत्व, शासनाच्या विविध सेवा व सवलती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण अशा विविध विषयावर स्वयंसेवकांनी काम करून शाश्वत विकासासाठी युवक हे ब्रीद यशस्वी केले. शिबिरातील विविध उपक्रमाबद्दल बागीलगे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment