कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व मंदिर समोरील तलाव सोबत परिसर असा छान निसर्गरम्य परिसर असून त्याकडे सद्या गावचे दुर्लक्ष होत् आहे. याचे व्यवस्थापन झाले तर परिसर खूपच वैभवशाली होऊन जाईल. सालाबादप्रमाणे ९ ते ११ मार्च २०२५ रोजी हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. पण तलावाच्या बाजूने असलेला संपूर्ण कचरा, रान, झाडे झुडपे यामुळे परिसर अस्वच्छ दुर्गंधीयुक्त बनला होता. दि २६ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्री चे औचित्य साधून लक्ष्मी गल्ली येथील तरुण व काही ग्रामस्थांनी श्रमदानातून हा परिसर स्वच्छ केला. त्यासाठी त्यासाठी त्यांनी पहाटे सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण दिवस श्रमदान केले. एक अत्यंत स्तुत्य उपक्रम यांनी राबविला असून एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे परिसर स्वच्छ झाला आहे.
या उपक्रमासाठी अनिल आंबेवाडकर विनायक आंबेवाडकर, महादेव आंबेवाडकर, रमेश कुंभार, सचिन बामणे, सुधीर बामणे, संतोष रेडेकर, दयानंद रेडेकर, संतोष नौकुडकर , वैभव कसलकर, शुभम कसलकर, राजू खंडू गावडे, वैजू नौकुडकर, मनोहर आंबेडकर, विष्णू हेबाळकर , प्रकाश हेब्बाळकर आदींनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment