कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी (महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर) डॉ. विनोद एस कोकितकर व डॉक्टर शितल विनोद कोकितकर यांचे गुरुकृपा क्लिनिक रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे. जे जी कॉम्प्लेक्स, निटूर रोड कोवाड येथे सुरू होणाऱ्या या क्लिनिक मध्ये मणक्याचे आजार संधिवात, सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त, पोटाचे विकार, लकवा (पॅरालेसीस), मुतखडा, मुळव्याध यावर विशेष उपचार होणार असून याशिवाय सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी, वाफ देणे, ऑक्सिमीटर, शुगर, बीपी तपासणी, सुवर्ण प्राशन (१० वर्षापर्यंतच्या मुलांसाठी) या सुविधा उपलब्ध असतील.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांचे हस्ते माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यावेळी डॉ बसवराज तुबची (एमडी काया चिकित्सा), डॉ पी एस पाटील, डॉ नेताजी विचारे, माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, सरपंच अनिता भोगण, शंकरराव आंबेवाडकर, शंकरराव मनवाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन सोनाप्पा दत्तू कोकितकर (प्राथमिक शिक्षक) बुक्कीहाळ, सौ वनिता सोनाप्पा कोकितकर, डॉ विनोद एस कोकितकर एमडी आयुर्वेदिक मेडिसिन KLE, डॉ शीतल विनोद कोकितकर (केदार) BAMS, CGO CCH यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment