पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग : उद्या उपांत्य व अंतिम सामने एसटी विरुद्ध पोलीस, माध्यमिक शिक्षक विरुद्ध बँक पतसंस्था सामने रंगणार आज पुणे ग्रामीणचे पोनि. संतोष घोळवे यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2025

पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग : उद्या उपांत्य व अंतिम सामने एसटी विरुद्ध पोलीस, माध्यमिक शिक्षक विरुद्ध बँक पतसंस्था सामने रंगणार आज पुणे ग्रामीणचे पोनि. संतोष घोळवे यांची उपस्थिती

 

एसटी महामंडळ विरुद्ध महावितरण यांच्यातील लढत प्रसंगी उपस्थित पो. नि. संतोष घोळवे, पो. नि. विश्वास पाटील, नायब तहसीलदार हेमंत कामत, चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील आदी मान्यवर तसेच दोन्ही टीमचे खेळाडू व पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) आयोजित संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची एकमेव असलेली क्रिकेट स्पर्धा 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग- २०२५' मध्ये सुपरएट फेरीतील थरारक सामने शनिवार दि २२/०२/२०२५ पूर्ण झाले आहेत. चंदगड पोलीस, एस टी महामंडळ, माध्यमिक शिक्षक आणि बँक पतसंस्था हे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. यानंतर उद्या दिनांक २३ रविवारी उपांत्य फेरीचा पहिला सामना चंदगड पोलीस विरुद्ध एसटी महामंडळ चंदगड आगार तर दुसरा सामना माध्यमिक शिक्षक विरुद्ध बँक पतसंस्था यांच्यात रंगणार आहे. यांच्यामधील विजेते संघ अंतिम विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध झुंज देतील.
    आज शनिवारी स्पर्धा करो या मरो स्थितीत आली असताना  स्पर्धेतील ८ बलाढ्य संघांची एकमेकांविरुद्ध लढत झाली.
    इंडॉल ग्राउंडवर (बेळगाव- वेंगुर्ला रोड, हिंडगाव फाटा नजीक ता चंदगड)  उद्या शनिवार दिनांक २२ रोजी नगरपंचायत विरुद्ध बँक व पतसंस्था, तहसील कार्यालय विरुद्ध माध्यमिक शिक्षक, एसटी महामंडळ विरुद्ध महावितरण, चंदगड पोलीस विरुद्ध प्राध्यापक वॉरियर्स सामने झाले. यात पोलीस एसटी माध्यमिक शिक्षक व बँक पतसंस्था या संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.  क्रीडा रसिकांनी या सर्व सामन्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
     आजच्या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस होता. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  (चंदगडचे माजी पोलीस निरीक्षक) संतोष घोळवे, नायब तहसीलदार हेमंत कामत, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, एस टी महामंडळाचे आगार प्रमुख सतीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता इफ्तिकार मुल्ला आदी मान्यावर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment