तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यासमोर प्रचंड आव्हाने आहेत. विविध विद्या शाखांचा प्रचंड विस्तार होत आहे. या सर्वांचे अत्याधुनिक ज्ञान शिक्षकांना होणे गरजेचे आहे. शिक्षकांचे वेळोवेळी प्रशिक्षण झाले अन शिक्षक अद्यावत झाला तरच विद्यार्थीही सक्षम घडवू शकतो असे विचार शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एन. व्ही. पाटील यानी व्यक्त केले.
शासनाच्या वतीने तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुक्यातील प्राथमिक, माध्यामिक व उच्य माध्यमिक शिक्षकांचे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण १० फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
यावेळी कानूर केंद्रप्रमुख जी. बी. जगताप, मुख्याध्यापक व्ही. के. फगरे, सुभाष बेळगावकर, टि. एल. तेरणीकर, व्ही. एन. सुर्यवंशी, गोविंद पाटील, सुनिल कुंभार आदि मान्यवर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात २२५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून या सर्वाना १६ तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तज्ञ मार्गदर्शक म्हणून इ. एल. पाटील, पी. एम. ओऊळकर, प्रा. सचिन पाटील, पी. एस. मगदूम, बाळकृष्ण मुतकेकर, विश्वास पाटील आदि काम करत आहेत. चार प्रशिक्षण वर्गांच वर्ग समन्वयक म्हणून बीआरसी विषय तज्ञ सुनील पाटील, महादेव नाईक, अमृत देसाई आदी काम करत आहेत.
No comments:
Post a Comment