कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
निट्टूर रोड (जे जी कॉम्प्लेक्स) कोवाड (ता. चंदगड) येथे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ विनोद एस कोकितकर (एमडी, आयुर्वेदिक मेडिसिन KLE) व डॉ शितल विनोद कोकितकर- केदार (BAMS, CGO CCH यांच्या गुरुकृपा क्लिनिकचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले. हे रुग्णालय कोवाड व परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी डॉ बसवराज तुबची (एमडी काया चिकित्सा), डॉ पी. एस. पाटील, डॉ नेताजी विचारे, डॉ व्ही. पी. पाटील, गोपाळराव पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, सरपंच अनिता भोगण, शंकरराव आंबेवाडकर, शंकरराव मनवाडकर, अशोकराव देसाई, वसंत पाटील (म्हाळेवाडी) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील, भरमूआण्णा, गोविंद पाटील, शंकर मनवाडकर, पी. एस. पाटील आदींची शुभेच्छा पर भाषणे झाली.
यावेळी निवृत्त सुभेदार मेजर रघुनाथराव केदार, सौ सुषमा केदार (सांगोला), ओम मेडिकलचे मालक जोतिबा वांद्रे, सौ सुमित्रा वांद्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा कोकीतकर कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोनाप्पा दत्तू कोकितकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनोद सोनाप्पा कोकितकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ आतवाडकर यांनी केले.
या क्लिनिक मध्ये रुग्णांना मणक्याचे आजार संधिवात, सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त, पोटाचे विकार, लकवा (पॅरालेसीस), मुतखडा, मुळव्याध यांसह स्त्रीरोग बालरोग पंचकर्मचिकेचा आयुर्वेदिक मेडिसिन, वाफ देणे, ऑक्सिमीटर, शुगर, बीपी तपासणी, सुवर्ण प्राशन (१० वर्षापर्यंतच्या मुलांसाठी) या सुविधा उपलब्ध असतील. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी येथील तज्ज्ञ, तत्पर व आपुलकीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकितकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment