शिनोळी खुर्द येथील प्राथमिक शाळेत भरली विज्ञानाची जत्रा, तब्बल २५ प्रयोगातून विद्यार्थ्यांनी अनुभवला स्वनिर्मितीचा आनंद - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2025

शिनोळी खुर्द येथील प्राथमिक शाळेत भरली विज्ञानाची जत्रा, तब्बल २५ प्रयोगातून विद्यार्थ्यांनी अनुभवला स्वनिर्मितीचा आनंद

विज्ञानाच्या जत्रेत स्वनिर्मित उपकरणांची प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थ्यींनी

शिनोळी / सी. एल. वृत्तसेवा

        पीएमश्री श्रीराम विद्यामादीर शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील शाळेत भरली विज्ञानाची जत्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला स्वनिर्मितीचा आनंद.  तब्बल 25 प्रयोग सादर केले.

        28 फेब्रुवारी निमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्य. स. अध्यक्ष वैजनाथ मेणसे होते. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. सुरवातीला विज्ञान प्रतिज्ञा घेण्यात आली. शा. व्य. सदस्य महेश पाटील यांनी फीत कापून  उद्घाटन  केले. या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पाण्यावरील प्रयोग, लिटमस पेपर, गृत्वीय बल, चुंबक, मिठाचे द्रावण, स्वनिर्मित JCB असे अनेक प्रकारचे प्रयोग सादर केले व स्वनिर्मितीचा आनंद लुटला.

     यावेळी सुनील तुडयेकर, पालक गजानन पाटील, शिक्षक हंम्बिरराव कदम, एस. पी. नाईक व श्री. गुरव उपस्थित होते. विज्ञान विषयी सखोल मार्गदर्शन प्रकाश पाटील मुख्याध्यापक यांनी केले. विनायक गिरी यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. 

                                                                                                                बातमी सौजन्य - विनायक गिरी

No comments:

Post a Comment