कुदनूर / सी एल वृत्तसेवा
सद्या छावा चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्र व संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांसह शाळकरी मुलांच्या मुखातूनही केवळ छावा चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. शिवजयंती किंवा अन्य मिरवणुकीचे डीजे लावून डान्स करण्यापेक्षा मंडळांनी हा चित्रपट दाखवावा अशी संकल्पना पुढे येत आहे. मुलांच्या मागणीनुसार याची अंमलबजावणी ही गावोगावी होताना दिसत आहे. हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा व भावी पिढीला दिशादर्शक ठरणारा आहे. राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त केला असून प्रत्येक शाळेतील मुलांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा यासाठी शासन स्तरावरून नियोजन व्हावे अशी मागणी होत आहे.
बातमीदार - सचिन तांदळे
No comments:
Post a Comment