![]() |
नागणवाडी येथे व्हीसीद्वारे 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' चे उद्घाटन होत असताना उपस्थित चंदगड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र' हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम २.०' संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. या विशेष मोहिमेचे उद्घाटन संजय गांधी विद्यालय नागनवाडी ता. चंदगड येथे शनिवार दि. ०१/०३/२०२५ रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
या विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व शाळा कॉलेजमधील सर्व मुला मुलींची मोफत आरोग्य तपासणी, जन्मजात आजार व इतर सर्व आजारांवर तपासणीनंतरच्या संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया इत्यादी मोफत केल्या जाणार आहेत.
नागणवाडी येथे पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवराज कुपेकर, बालरोग तज्ञ डॉ गजेंद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी डी सोमजाळ, बीआरसी विषय तज्ञ भाऊसाहेब देसाई, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ ऋतुजा पोवार (उपकेंद्र नागनवाडी), आरोग्य सहायक मेंगाणे (प्रा.आ. केंद्र कानूर खुर्द), आरोग्य सेवक प्रवीण टोपले (उपकेंद्र नागनवाडी), राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम समन्वयक डॉ योगेश पोवार, डॉ स्नेहल पाटील, डॉ पल्लवी निंबाळकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुचिता बांदेकर, कृष्णा परीट, परिचारिका छाया पुजारी, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर दिवसभरात सुमारे ८०० मुला मुलींची तपासणी करण्यात आली. याकामी हायस्कूल मुख्याध्यापक महादेव शंकर भोगूलकर व सर्व स्टाफचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment