काजु बागेला आग, लाखोंचे नुकसान, पोलीसात तक्रार दाखल, कृषी विभागाकडून पंचनामा.... - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2025

काजु बागेला आग, लाखोंचे नुकसान, पोलीसात तक्रार दाखल, कृषी विभागाकडून पंचनामा....

 


आंबोली / सी. एल. वृत्तसेवा 

        ओवळीये (ता. सावंतवाडी) येथे काल शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत महादेव गुणाजी कलमिसकर यांच्या मालकीच्या बागेतील काजू, नारळ, आंबा कलमे मिळून जवळपास २५० झाडे जळून खाक झाली. या आगीत पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन ची केबल, दोन ट्राँल्या जळाऊ लाकडे जळून खाक झाली आहे आहेत. या आगीत कलमिसकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत काजू - बागायत मालक महादेव कलमिसकर यांनी कृषी विभाग तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बागायतीच्या नुकसानीचा पंचनामा केला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी श्री. कलमिसकर यांनी केली आहे. ऐन काजू हंगामातच झाडांना आग लागल्याने कलमिसकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment