कोवाड : निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयात चंदगड पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुष्ठरोग निर्मूलन निबंध स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
प्राचार्य एस. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाल्या. स्पर्धेत जान्हवी विश्वास पाटील (प्रथम ),सृष्टी शंकर जोशीलकर (व्दितीय), सुहानी रामा भूगोण (तृतीय), प्रांजल अशोक पाटील व सायली नंदकुमार नौकुडकर यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. स्पर्धेचे बक्षिस वितरण उपप्राचार्य एस. एम. माने, पर्यवेक्षक व्ही. बी. व्हन्याळकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरोग्य सहाय्यक रवी पाटील, अनंत भोगण, वसंत गायकवाड, सुभाष कांबळे, संभाजी आघोशे, चेतन कणसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment