कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील सीमदेव यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ठीक ११ वाजता 'संग्या बाळ्या' एक विश्वासघात नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. नाईक सेवा समाज मंडळ यांचे मार्फत होणाऱ्या या चार अंकी नाट्यप्रयोगाचे उद्घाटन सेवा सोसायटी चेअरमन रामचंद्र चिंचणगी यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शामराव बेनके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी पंस. सदस्य अनिल सुरतकर, सरपंच रेणुका नरी, उपसरपंच बाबुराव दुकळे, ग्रामविकास अधिकारी श्रीधर भोगण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या नाटकातील पात्रे व भूमिका नाईक समाजातील कलाकार साकारणार आहेत. यात संग्या - कऱ्याप्पा नरी, बाळ्या- अण्णाप्पा चिंचणगी, इराण्णा- बाळू नाईक, पऱ्यांमा- अण्णाप्पा व्हन्याळकर, वीरपक्षी- गुंडू मेटकुपी, मारवाडी- युवराज चिंचणगी, सूत्रधार- संभाजी वरगावकर, पुजारी- सुरेश नाईक, गाडीवाला- शंकर नाईक, बसवंत- मारुती व्हन्याळकर, हजरत- आप्पांना मेटकुपी, सावकार- किरण नाईक, म्हातारा- हनुमंत नाईक, गंगा- अभिनेत्री संगीता (बेल्लद बागेवाडी, गोकाक), बालकलाकार- मुक्ता नरी, कल्याणी चिंचणगी, नरेंद्र मेटकुपी, अमोल मेटकुपी या कलाकारांच्या भूमिका असून
नाट्यदिग्दर्शक- म्हणून भिकू नाईक (हलकर्णी), सह दिग्दर्शक- परसू नरी, हार्मोनियम- रघुनाथ कांबळे व गिरीश (बैलहोंगल), डफवाला- बसवराज अमीनभावी (धारवाड) आदी कलाकार काम पाहणार आहेत.
बैलवाड (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) येथील रायाप्पा पट्टार यांनी रचलेलं हे चार अंकी लोकनाट्य कर्नाटकातील नाट्य रसिकानी गेली कित्येक वर्षे अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. प्रेम, मैत्री आणि विश्वासघात यांची कहाणी असलेलं 'संग्या बाळ्या' हे नाटक माणगाव येथे तिसरी वेळ होत असून यापूर्वी शेवटचा नाट्य प्रयोग २३ वर्षांपूर्वी झाला होता. नाट्य रसिक व भाविकांनी या महानाट्याला उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन नाईक सेवा समाज मंडळ माणगाव व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment