चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरातील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना (शहरी) २.० या योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे व शंकाचे निरसन यांची माहिती देण्यासाठी मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळात नगरपंचायत सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती शिल्पाराणी जाधव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment