येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात प्रा. सरोजिनी दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराराणी सखी मंच च्या वतीने पारंपरिक आणि अरेबिक मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. पारंपरिक मेहंदी मध्ये फुलांची नक्षी, मोर, वेलबुटी, डोली,तबला यासारखे पारंपरिक डिझाईन्स तर अरेबिक मेहंदी मध्ये आधुनिक आणि आकर्षक डिझाईन्स रेखाटण्यात आल्या. विद्यार्थिनीनी आपल्या हातांवर आणि इतरांच्या हातांवर मनमोहक मेहंदी काढून उपस्थितांची मने जिंकली.
समन्वयिका प्रा.सरोजिनी दिवेकर यांनी स्पर्धेचे आयोजन करताना सांगितले, " विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. मेहंदी ही एक पारंपरिक कला असून ती जपली पाहिजे. तसेच आधुनिक अरेबिक मेहंदीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. "
पारंपरिक मेहंदी स्पर्धेतील विजेत्यांची नावे अनुक्रमे प्रथम क्रमांक विभागून कु. अंकिता आनंदा कदम बीएससी भाग दोन, कु. स्नेहल सुरेश झेंडे बीएससी भाग दोन, द्वितीय क्रमांक कु. सृष्टी अशोक पाटील बी कॉम भाग तीन, कु. वैष्णवी एकनाथ बांदेकर बीकॉम भाग दोन, तृतीय क्रमांक कु. मधुरा सट्टूपा कांबळे बीएससी भाग दोन, उत्तेजनार्थ कु. मेहेक नईम पटेल बीकॉम भाग एक, दर्शना विजय माळी बीए भाग 3.
अरेबिक मेहंदी स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक कु. खन्सा खलील अहमद अल्लाखान बीएससी भाग एक, द्वितीय क्रमांक कु. आलिशा नजीर अडकुरे बी कॉम भाग एक, तृतीय क्रमांक कु. बदर बरकत आली नाईकवाडी बीएससी भाग दोन, उत्तेजनार्थ प्रथम वैष्णवी वसंत कोळगे बीएससी भाग दोन, कु. सृष्टी अशोक पाटील बीएससी भाग 3.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. अन्वी साळुंखे, सौ. कल्पना निखारे यांनी काम पाहिले. या स्पर्धेला प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. आभार प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment