चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस. डी. गोरल होते. यावेळी फिरोज मुल्ला यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती दाखवून यश संपादन करण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. गोरल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धा शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले. प्रारंभी क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी खेळाचे महत्व विशद करून विविध खेळाविषयीची उदबोधक माहिती सांगितली. क्रीडा महोत्सव शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले.
प्रा. ए. डी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. एस. मासाळ यांनी आभार मानले. यावेळी प्रा. लालासाहेब गायकवाड, प्रा. एन. जी. आजरेकर, डॉ. रंजना सूर्यवंशी, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. के. पाटील, प्रा. आर. के. तेलगोटे, डॉ. एस. एस. सावंत यांच्यासह या क्रीडा महोत्सवाला असंख्य विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment