आईच्या स्मरणार्थ कालकुंद्री येथे सार्वजनिक वाचनालयाला पुस्तकांचे दान - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2025

आईच्या स्मरणार्थ कालकुंद्री येथे सार्वजनिक वाचनालयाला पुस्तकांचे दान

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत सदस्य विठोबा सिताराम पाटील यांनी आपल्या आई कै. राणूबाई सिताराम पाटील यांच्या स्मरणार्थ, आपला मुलगा गजानन विठोबा पाटील याच्या वाढदिवसानिमित्त गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला दर्जेदार अशी पुस्तके भेट दिली.

      पुस्तके प्रदान कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालय अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. स्वागत विलास शेठजी यांनी केले. यावेळी वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. या विधायक कार्याबद्दल पाटील परिवाराचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. असे उद्गार जेष्ठ नागरिक झेवियर क्रुझ यांनी यावेळी बोलताना काढले. माजी उपसरपंच सुरेश नाईक, युवराज पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. विठोबा पाटील यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. बजरंग पाटील, नारायण पाटील, दीपक कालकुंद्रीकर, ग्रामस्थ, वाचक उपस्थित होते. प्रा. व्ही. आर. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment