चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे बेळगाव वेंगुर्ले रोडवर झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सव्वा दहा च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील अझरुद्दीन अन्वर नाईक (वय 39 आझाद गल्ली, चंदगड) हे ठार झाले असून गाडीवर मागे बसलेले गौस बाबू मदार (रा. आझाद गल्ली चंदगड हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सिकंदर मुस्फाक नाईक यांनी चंदगड पोलिसात दिली असून ट्रॅक्टर चालक श्रीधर भैरव पाटील (रा. ढेकोळीवाडी, ता. चंदगड जिल्हा कोल्हापूर) यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 105, 281, 125 अ ब मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (1) ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक 16 रोजी सकाळी अझरुद्दीन व त्याचा मित्र गौस असे दोघे दुचाकीवरून चंदगड ते बेळगावकडे फुले आणण्यासाठी जात असताना मजरे कार्वे येथे गणेश आर्टिकल समोर दोन ट्रॉलीमध्ये खत भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात अझरुद्दीन यांच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र गौस यांच्या पायास गंभीर दुखापत झाली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार सुरू आहे.
No comments:
Post a Comment