चंदगड : सी एल वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) येथील एकाने मजरे कार्वे ता. चंदगड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग कृष्णा पाटील, वय 55 असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची वर्दी निंगाप्पा ज्योतिबा इंजल राहणार मजरे कार्वे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी कृष्णा पाटील हा वर्दीदार निंगाप्पा इंजल यांचा जावई असून तो गेली काही वर्षे मजरे कार्वे येथेच राहत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारूच्या नशेत त्याने कार्वे येथील घराच्या मागील शेडमध्ये असलेल्या सिमेंट गॅलरी च्या लोखंडी हुकला फेट्याने गळफास घेतला व खाली जमिनीवर पडून मयत झाला. ही घटना 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी चार च्या सुमारास घडली. या घटनेची बी एन एस एस 194 प्रमाणे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment