पारगडवर ११ व १२ रोजी 'माही' निमित्त दोन दिवस नाटक, पोवाडे व व्याख्यानसह धार्मिक कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2025

पारगडवर ११ व १२ रोजी 'माही' निमित्त दोन दिवस नाटक, पोवाडे व व्याख्यानसह धार्मिक कार्यक्रम


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
       छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पारगड वरील भगवती- भवानी मंदिर येथे माघी यात्रा दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यंदाही मंगळवार व बुधवार दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांनी यात्रा संपन्न होणार आहे. मंगळवार ११ रोजी सकाळी १० वाजता शाम तांबे दाम्पत्याच्या हस्ते पूजा, दुपारी बारा वाजता महाआरती तर रात्री नऊ वाजता 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य' विषयावर शिवाजी वसंतराव देसाई (गोवा) यांचे व्याख्यान. रात्री १२ वाजता महाप्रसाद, रात्री २.०० वाजता देवीचा गोंधळ व जागर.  बुधवार १२ रोजी सकाळी १० वाजता महादेव मंदिर बांधकाम वर्धापन दिनानिमित्त अमृत महादेव शेलार यांचे हस्ते पूजन. दुपारी १२ वाजता महाप्रसाद. पुन्हा सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसाद. भवानी मंदिर शेजारील कै शंकर कानोबा माळवे रंगमंच येथे रात्री ९ वाजता शिवशाहीर रंगराव पाटील व पथक कोल्हापूर यांचा 'शिवशाही ते लोकशाही' पोवाडे तर रात्री ११ वाजता पारगड ग्रामस्थ प्रस्तुत 'माहेरची पुण्याई'हे हृदयस्पर्शी सामाजिक नाटक सादर होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविक व पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन पारगड जनकल्याण संस्था मुंबई व ग्रामस्थ पारगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment