१३ तारखेपूर्वी गडहिंग्लज- काळभैरी रस्ता दुरुस्ती व सफाई करा..! मनसेचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2025

१३ तारखेपूर्वी गडहिंग्लज- काळभैरी रस्ता दुरुस्ती व सफाई करा..! मनसेचे निवेदन



गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा 
  गडहिंग्लज शहर व तालुक्याचे आराध्य दैवत श्री काळभैरव ची माही यात्रा 13 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. गडहिंग्लज शहर ते मंदिर हे अंतर सुमारे सात किलोमीटर इतके आहे. या रस्त्यावर अनेक खाचखळगे पडले असून डांबरी रस्त्याची खडी उखडली आहे. 
  गडहिंग्लज शहरापासून बड्याची वाडी नजीक डोंगर कपारीत वसलेल्या मंदिरापर्यंत निघणाऱ्या पालखीसोबत हक्कदार, मानकरी यांच्यासोबत शेकडो भाविक अनवाणी पायाने मंदिरापर्यंत चे सात किलोमीटर आंतर जात असतात. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे आशा भाविकांच्या पायांना इजा होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी काळभैरी मंदिर पर्यंतचा हा रस्ता तात्काळ साफसफाई व दुरुस्ती करावी. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार गडहिंग्लज यांना देण्यात आले. निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश शिवाजी चौगुले व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रभात शंकर साबळे आदींच्या सह्या आहेत. निवेदन देताना गडहिंग्लज तालुका मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment