![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे कुदनूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर पलटी झालेली उसाने भरलेली ट्रॉली. |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर कडून कालकुंद्री (ता. चंदगड) मार्गे दौलत साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली कालकुंद्री गावाजवळ पलटी झाली. कालकुंद्री- कुदनुर (ता. चंदगड) मार्गावर कालकुंद्री गावाजवळ आज दि 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. बाजूने जाणाऱ्या वाहनास पुढे जाण्यासाठी वाट करून देताना डाव्या बाजूस ट्रॉली पलटी झाली. ट्रॉली उजवीकडे पलटी झाली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता.
कुदनूर येथील शेतकरी श्रीगेश बिरजे यांचा ऊस बीड येथील ऊस तोडणी डोळे मार्फत अथर्व दौलत कारखान्याकडे चालला होता. ट्रॅक्टर चालक नवीन व रस्त्यातील खाच खळग्यांपासून अनभिज्ञ असल्यामुळे अपघात घडला. काल कुंद्री येथील राईस मिल कडे जाणाऱ्या वळणावर साईड पट्ट्या ओल्या झाल्यामुळे चाक चिखलात रुतून उसाने भरलेली ट्रॉली लगतच्या गवताच्या गंजीवर पलटी झाली. ट्रॉली गवत गंजीवर पलटी झाल्यामुळे अधिकचे नुकसान होण्यापासून बचाव झाला.
अपघातामुळे कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी बु. राजगोळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment