चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजिस्टर) आयोजित 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग- २०२५' क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी) एकूण ६ सामने खेळवण्यात आले. आज झालेल्या सामन्यात नगरपंचायत चंदगड, चंदगड पोलीस, एसटी महामंडळ चंदगड आगार, कृषी विभाग व महावितरण संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन रविवार दि २ फेब्रुवारी रोजी चंदगड न्यायालयाचे सहन्यायाधीश वामन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, एसटी महामंडळ आगार व्यवस्थापक सतीश पाटील, यांच्यासह कृषी, आरोग्य, पीडब्ल्यूडी, आदी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत प्रो कबड्डी चे स्टार, दबंग खेळाडू सिद्धार्थ देसाई (हुंदळेवाडी ता. चंदगड) यांच्या हस्ते पार पडले होते.
आज दि. ८ रोजी झालेल्या नगरपंचायत चंदगड विरुद्ध वन विभाग चंदगड यांच्यामधील पहिल्या सामन्यात नगरपंचायतने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले वन विभागाने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावांपर्यंत मजल मारली. नगरपंचायतीने ही धावसंख्या ४ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पार करून हा सामना एकतर्फी खिशात घातला.
चंदगड पोलीस विरुद्ध एसटी महामंडळ यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पोलीस संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारत एसटी महामंडळाला सहा षटकात ४ गडी बाद ५१ धावावर रोखले तर ही धावसंख्या चार षटकात केवळ एक गडी गमावून पूर्ण केली. पोलीस टीमचे स्वप्निल मिसाळ यांनी ५४ पैकी ४३ धावा एकट्यानेच फटकावल्या हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
तिसरा सामना कृषी विभाग विरुद्ध एसटी महामंडळ यांच्या झाला यावेळी एसटी महामंडळाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत सहा षटकात एक बाद ८६ धावा धावांचा डोंगर रचला. कृषी विभागाला सहा षटकात दोन गडी बाद ६१ धावा पर्यंतच मजल मारता आली. हा सामना जिंकून एसटी महामंडळाने पोलीस टीम बरोबर पहिल्या सामन्यात हारल्यानंतर चांगलेच कम बॅक केले.
चौथा सामना प्राध्यापक वॉरिअर्स विरुद्ध महावितरण यांच्यामध्ये सामना रंगतदार ठरला. प्राध्यापक टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला महावितरण ने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात २ गडी बाद ६६ धावा फटकावल्या तथापि प्राध्यापक संघाला ६ षटकात ५१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे महावितरणने हा सामना १५ धावांनी खिशात घातला.
आजच्या दिवसातील पाचव्या सामन्यात चंदगड पोलीस टीमने आरोग्य विभागाचा पराभव केला. पोलीस टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना आरोग्य विभागाचे सहा षटकात ४ गडी बाद ४५ धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल चंदगड पोलीस टीमने १ गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या पूर्ण करून क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम बनण्याचा मान मिळवला. या सामन्यातही स्वप्निल मिसाळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उद्घाटनाच्या दिवशी पोलीस टीमने कृषी विभाग वर विजय मिळवला होता. अशाप्रकारे सलग तीन सामन्यात त्यांचे तीन विजय झाले व ग्रुप मधून तो संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरला आहे.
आज झालेल्या कृषी विभाग विरुद्ध आरोग्य विभाग यांच्यातील शेवटच्या ६ व्या सामन्यात आरोग्य विभागाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ६ षटकात ४८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कृषी विभागाने शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत सहा गडी बाद ४८ धावा करून हा थरारक सामना जिंकला. शेवटच्या चेंडूवर जीवन पालमपल्ले यांनी अनपेक्षितपणे चौकार ठोकून सर्वांनाच चकित केले.
उद्या दिनांक ९ रोजी होणारे सामने पुढील प्रमाणे.
No comments:
Post a Comment