![]() |
कुदनूर येथे झालेल्या कराटे बेल्ट परीक्षेत पास झालेले विद्यार्थी प्रमाणपत्रासह, यावेळी उपस्थित मार्गदर्शक व मान्यवर |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर येथे गेल्या सहा महिन्यांपासून 'कुंग-फु कराटे' प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. गावातील मुलामुलींना मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्रच्या कुदनूर शाखेचे उपाध्यक्ष कराटे मास्टर भरमानी पाटील (4th डिग्री ब्लॅक बेल्ट) हे कुदनूर व कालकुंद्री गवातील मुला मुलींना प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षण वर्गात तयार झालेल्या कराटेपटूंची नुकतीच कुदनूर येथे 'कराटे बेल्ट एक्साम' ही पहिली कराटे बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण ६५ कराटेपटुंनी भाग घेतला. परीक्षक म्हणून कराटे मास्टर विनायक दिनकर, ज्ञानेश्वर चिक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
परीक्षेनंतर कराटे बेल्ट चे वितरण करण्यात आले. बेल्टचे वितरण ईश्वर नारायण गवंडी ,(अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा कुदनूर), दिग्विजय जोतिबा खवनेवाडकर (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कन्या विद्यामंदिर कुदनूर), सुरेश पवार (अध्यक्ष तंटामुक्त कमिटी कुदनूर), राजू महादेव डोणकरी (मुख्याध्यापक कन्या विद्यामंदिर कुदनूर), यादू रामू मोदगेकर (मुख्याध्यापक कुमार विद्यामंदिर कुदनूर), संतोष कामील राऊत (बस चालक व वाहक कोल्हापूर एस.टी.महामंडळ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या परीक्षेत कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुला मुलींनी आत्मविश्वासाने प्रात्यक्षिके दाखवली. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी प्रशिक्षक भरमानी पाटील यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment