![]() |
नांदवडे येथे पकडलेल्या अवैध दारू साठ्यासह पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व पथकातील पोलीस हवालदार आनंदा नाईक, पो. ना. नितीन डोंगरे, पो. कॉ. स्वप्नील मिसाळ, आनंदराव देसाई, मीनाक्षी मेथे, नितीन पाटील आदी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तालुक्यातील अवैध धंदे विरोधात चंदगड पोलिसांनी कारवाई गतिमान केली आहे. चंदगड पोलिसांनी काल दि ३/३/२०२५ रोजी सायंकाळी नांदवडे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे गोवा बनावटीची सुमारे २ लाख १२ हजार ९३० रुपयांची दारू पकडली. महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या हा मुद्देमाल जवळ बाळगलेल्या आशा धर्मनाथ गावडे, रा. नांदवडे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई, ९०, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदगड पोलिसांची गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कारवाईतील संशयित आरोपी अशा गावडे या नांदवडे येथील आपल्या घरी रोमन होडका, गोल्डन आईस ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल नंबर वन, डीएसपी ब्लॅक, किंग किंगफिशर स्ट्रॉंग व्हिस्की, रॉयल ग्रँड, ओल्डमंक, रिझर्व सेवन, मॅजिक मोमेंट होडका आदी कंपन्यांच्या गोवा बनावटीच्या लेबल असलेल्या विविध आकाराच्या व विविध किमतीच्या बाटल्या आपल्या ताब्यात बेकायदा व विनापरवाना बाळगलेल्या स्थितीत आढळून आल्या. यावरून त्यांच्यावर काल सोमवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंदा नाईक, पो. ना. नितीन डोंगरे, पो. कॉ. स्वप्नील मिसाळ, आनंदराव देसाई, मीनाक्षी मेथे, नितीन पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार याबाबतचा अधिक तपास पोहेकॉ आंबुलकर करत आहेत.
No comments:
Post a Comment