रविवारी कारवे येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2025

रविवारी कारवे येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

  चंदगड तालुका मेडिकल असो. व होप इनफर्टिलिटी क्लिनिक आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या सौजन्याने खास महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी  वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले आहे. मेडिकल असोसिएशन हॉल, बेळगाव- वेंगुर्ला रोड, पाटणे फाटा नजीक कार्वे, ता. चंदगड येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणाऱ्या शिबिरासाठी या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर वर्षा पाटील उपस्थित राहून तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 9922810900, 8867992208 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment