तांबुळवाडी येथील महादेव दुध संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्ष पदी दिगंबर पाटील यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2025

तांबुळवाडी येथील महादेव दुध संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्ष पदी दिगंबर पाटील यांची बिनविरोध निवड

 


चंदगड / प्रतिनिधी

    तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील महादेव सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्ष पदी दिगंबर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मेंद्र कानकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची २०२५ ते २०३० सालासाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. 

    दौलत साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. अध्यक्ष पदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव अरुण पाटील यांनी सूचविले उपाध्यक्ष पदासाठी दिगंबर पाटील यांचे नाव विलास पाटील यांनी सूचविले, त्याला अनुक्रमे सुरेश पाटील व संजय पाटील यांनी अनुमोदन दिले.यावेळी संचालक अशोक सुतार, मनोहर सावंत, रेखा बिर्जे, गीता पाटील यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष निंगोजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, अनिल पाटील, रामचंद्र वरपे, रमेश भोसले, जकोबा पाटील, गुंडू पाटील, महादेव पाटील, डॉ. रघुनाथ पाटील उपस्थित होते. सचिव तुकाराम कल्याणकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment