![]() |
कुदनूर येथे नवनिर्वाचित तंटामुक्त कमिटी सदस्यांचा सत्कार करताना सरपंच संगीता घाटगे व मान्यवर |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. सरपंच संगीता घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड कार्यक्रमात सुरेश वसंत पवार उर्फ राजू पवार यांची अध्यक्षपदी तर शिवाजी निंगाप्पा ओऊळकर यांची उपाध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली. १४ वर्षे सलग तंटामुक्त कमिटी चे अध्यक्षपद भूषवलेल्या मारुती खंदाळे यांनी यापुढे काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांना विश्रांती मिळाली आहे.
ग्रामपंचायत कुदनूर येथे झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत पोलीस पाटील नामदेव लोहार यांनी केले. सरपंच संगीता घाटगे यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नव्या तंटामुक्त कमिटीत बाबाजान कालकुंद्रीकर, केदारी कसलकर, सचिन पवार, हनमंत मोहनगेकर, भीमराव बामणे, रानबा ओऊळकर, दशरथ आंबेवाडकर, सिद्राम आंबेवाडकर, वनिता हेब्बळकर, आरती आंबेवाडकर, शशिकांत सुतार, विष्णू हेब्बाळकर, बबन कुराडे, वैजू बयाप्पा कुट्रे, हुसेन जमादार, अविनाश हुद्दार, मारुती आंबेवाडकर, दयानंद गोविंद जाधव, श्रीकांत नरसू कांबळे, जोतिबा बाळू नागरदळेकर आदी सदस्यांचा समावेश आहे. निवड प्रसंगी माजी अध्यक्ष मारुती खंडाळे, वैजू कुट्रे, जोतिबा नागरळेकर, धनंजय खवनेडकर, सिद्राम गुंडकल, ईश्वर गवंडी, दयानंद जाधव, वैजू कोरी, शामराव मल्हारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सिद्राम गुंडकल यांनी मानले.
No comments:
Post a Comment