बिजूरचा पंकज चौकुळकर भारतीय डाक विभागााची एम टी एस परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2025

बिजूरचा पंकज चौकुळकर भारतीय डाक विभागााची एम टी एस परीक्षा उत्तीर्ण

 

पंकज चौकुळकर

चंदगड / प्रतिनिधी 

        भारतीय डाक विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या एम टी एस स्पर्धा परीक्षा चंदगड येथील शिक्षक कॉलनी मधील रहीवासी पंकज एकनाथ चौकुळकर (मुळ गाव बिजूर) हा उत्तीर्ण झाला.

        पंकज चौकुळकर याने शिक्षण बी. ई. मेकॅनिकल ही पदवी प्राप्त  केली असून त्याने यापुर्वी ही मुंबई रेल्वे, कोकण रेल्वे, लातूर महानगरपालिकेची कर निरीक्षक या परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. सध्या चार पदाच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. एम. टी. एस परिक्षा उत्तीर्ण झाल्याने पंकज याची मुंबई येथील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे नियुक्ती होणार आहे. पंकज चौकुळकर याच्या अन्य दोन भाऊही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सावंतवाडी बांधकाम विभाग व रत्नागिरी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सेवा बजावत आहेत, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरी मिळवणारे पंकज चौकुळकर बंधुचे एकमेव उदाहरण आहे.पंकजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment