![]() |
कुदनूर येथील जागृत थळोबा देव |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर, ता. चंदगड येथे थळदेव यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. शिमगा धुलीवंदन सणांना लागूनच दरवर्षी ही यात्रा केली जाते. कोकणात या देवाला महाथळ म्हणून संबोधले जाते तर घाटमाथाच्या पूर्वेकडील भागात अनेक गावात थळोबा अर्थात थळदेव आहेत. हा देव गावच्या सीमांचा रक्षण कर्ता किंवा पहारेकरी म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी या देवाला सीमदेव असेही म्हटले जाते. चोर व चांडाळ किंवा अपप्रवृत्तीच्या लोकांना आळा घालून त्यांना पातळात गाडून टाकण्याचे कार्य हा देव करतो अशी श्रद्धा आहे. कुदनूर येथील थळ देवाचे मानकरी पुजारी म्हणून तुकाराम कांबळे हे काम करत होते. सध्या हे काम कृष्णा कांबळे हे करत आहेत. गावातील श्री कल्मेश्वर आणि श्री सिद्धेश्वर देवतांच्या आज्ञेनुसार स्थळदेव गावच्या सीमा रक्षणाचे कार्य करतो अशी दंतकथा आहे. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने शेकडो ग्रामस्थ पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या देवाची पूजा करतात.
No comments:
Post a Comment