चंदगड येथील राम मंदिरमध्ये समरसता कुंभ संपन्न.........प्रयागराज येथील तीर्थकलश पूजनासाठी चंदगडमध्ये - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2025

चंदगड येथील राम मंदिरमध्ये समरसता कुंभ संपन्न.........प्रयागराज येथील तीर्थकलश पूजनासाठी चंदगडमध्ये

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समरसता कुंभ नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. १४४ वर्षांनी आलेल्या महा कुंभाला प्रत्येकालाच जाणं शक्य नाही. याचा विचार करून अनुलोम सामाजिक संस्थेने प्रयागराज येथील तीर्थकलश पूजनासाठी चंदगड क्षेत्रामध्ये आणला आहे. अनुलोम संस्थेचे चंदगड विधानसभा समन्वयक अमेय सबनीस यांनी सदर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

          प्रयागराज येथे हिंदू धर्मातील सर्व जातीतील लोकांनी जाऊन स्नान केले. हिंदू एकतेचे दर्शन संपूर्ण जगाला या माध्यमातून घडले. याच धरतीवर प्रगतशील समाजातील ११ जोडप्यांच्या माध्यमातून कलशाचे पूजन करण्यात आले. अमेय सबनीस यांनी प्रयागराज येथील महाकुंभा बद्दल माहिती दिली. दिपक वड्डेर व विजय गुरव यांनी अनुभव कथन केले. अनुलोम वस्तिमित्र, स्थान मित्र, प्रभावशाली व्यक्ती, प्रगतशील समाज उपस्थित होता. कलशाचे पूजन झाल्यानंतर आरती करून प्रसाद वाटप झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 

No comments:

Post a Comment