चंदगड : सी एल वृत्तसेवा
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कोल्हापूर विभागातील चंदगड तालुका शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. चंदगड तालुक्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे- निवृत्ती तुकाराम कुट्रे (अध्यक्ष), संतोष बाळू मालुसरे (उपाध्यक्ष), गोविंद पांडुरंग मासरणकर (प्रशासक), तेजस शिवाजी चौगुले (सह प्रशासक), अभिषेक राजेंद्र पाटील (संपर्क प्रमुख), संतोष जोतिबा सुतार (सह संपर्क प्रमुख), राजू धोंडीबा गावडे (सचिव), पंकज शंकर कोकितकर (संघटक), गणपती दिनकर सावंत (सोशल मीडिया प्रमुख), मयूर जनकु पाटील (सह सोशल मीडिया प्रमुख), प्रवीण पांडुरंग पाटील (सह संघटक) यांची सह्याद्री प्रतिष्ठान संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे व गणेश मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांना कामे वाटून देऊन किल्ले पारगड वरील सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांच्या स्मारका सारखाच भीम पराक्रम तसेच चंदगड तालुका व परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्वलंत साक्षीदार ठरलेल्या विविध दुर्लक्षित गडांचे संवर्धन सह्याद्री प्रतिष्ठानच्या नव्या कार्यकारिणीच्या काळात घडेल. अशी अपेक्षा वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment