सविता कुंभार लिखित मोगरा काव्यसंग्रहाचे कोवाड येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2025

सविता कुंभार लिखित मोगरा काव्यसंग्रहाचे कोवाड येथे प्रकाशन


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा            
    सौ. सविता श्रीधर कुंभार यांच्या 'मोगरा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच कोवाड, ता. चंदगड येथील पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन येथे पार पडले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी व लेखक संजय साबळे यांनी केले. चंदगड तालुक्यातील किणी गावच्या सविता कुंभार जिल्हा परिषदेच्या कडलगे प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून मोगरा हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील म्हणाले समाजातल्या संवेदनशील मनातून साहित्याची निर्मिती होते. नोकरी व्यवसाय करता करता छंद जोपासले की जगणं सुखकर होण्याबरोबरच हातातील कामही प्रभावी होतं. शिक्षक कविता करत असतील तर ते विद्यार्थ्यांना कविता चांगली समजून सांगू शकतात. अशा शब्दात सविता कुंभार यांचा गौरव केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ कवी डॉ पोतदार यांनी तालुक्याला पु ल देशपांडे, रणजीत देसाई यांच्यासारख्या साहित्यिकांचा वारसा लाभला असून यापुढेही येथून प्रतिभावंत कवी लेखक निर्माण व्हावेत अशा शुभेच्छा देताना नवोदितांना मार्गदर्शन केले. यावेळी लेखक के. जे. पाटील, पांडुरंग जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली. सविता कुंभार यांनी कविता संग्रहाच्या प्रवासाबद्दल माहिती सांगितली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर, रसिक, शिक्षक विविध संघटनांचे पदाधिकारी, किणी, कालकुंद्री व कडलगे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच कुंभार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुंत्रसंचालन विनायक गावडा यांनी केले. आनंद कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप्पाजी रेडेकर, विनायक गिरी, विनायक गावडा, आनंद कांबळे, बाळकृष्ण मुतकेकर, संभाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment