![]() |
नवोदय परीक्षेत विद्यालयाला प्रवेश मिळाल्याबद्दल स्वप्निल जंगले यांची अभिनंदन करताना मुख्याध्यापक गोडसे व शाळेतील शिक्षक |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. चंदगड तालुक्यातील विविध शाळांनी चमक दाखवली असून केंद्र शाळा नागनवाडीचा विद्यार्थी स्वप्नील संतोष जंगले जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.
![]() |
चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळाल्याबद्दल श्रीरंग दळवी चे अभिनंदन करतात मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ (स्वेटर वाला) |
त्याचबरोबर ९ मार्च २०२५ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेतील इयत्ता चौथीच्या चार तर सातवीतील एका विद्यार्थ्याने यश मिळविले. पाचवी स्कॉलरशिप च्या तयारीसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांत इयत्ता चौथीतील श्रीरंग भरमू दळवी १६२ गुण, प्रतिक परशराम गावडे १४६, इंद्रनील सतीश रेळेकर १२६, श्लोक सुरेश गावडे १२४, तर इयत्ता सातवी मधील संस्कृती सुरेश गावडे १२२ गुण या विद्यार्थिनी यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांना ४ थी चे वर्गशिक्षक उमाजी खिलारी व ७ वी वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक संजय घोळसे यांच्यासह आशिष रॉड्रिक्स, सीमा पाटील, अर्चना कुंभार, सानिया पठाण आदी शिक्षकांचे मार्गदर्शन तर केंद्रप्रमुख पा. ल. मुळीक व शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment