चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलत कारखान्यानें चालू गळीत हंगामातील शेवटच्या दिवसापर्यत गाळप झालेल्या ऊसाची विनाकपात एकरकमी प्रतिटन रु. ३१०० रुपयेप्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. तसेच तोडणी वाहतुकीची बिले एप्रिलच्या पहिल्या आठवडयामध्ये जमा करणार असल्याचे सांगितले.
गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ६ लाखाचे उदिष्ट होते. तोडणी वाहतुकीचे नियोजन त्याप्रमाणे केले होते. पण या वर्षी पाऊस व एकरी उत्पादनात घट झालेमुळे ऊस गाळप उध्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. तरीपण कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे कमी कालावधीत ४ लाख ६ हजार ६९४ इतके गाळप झाले आहे. गळीत हंगाम शेवटच्या दिवसापर्यंत गाळप झालेल्या संपुर्ण ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
या वेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, एम. आर. पाटील (जी. एम. टेक्निकल), दत्तकुमार रक्ताडे जी. एम. (प्रोसेस), दयानंद देवाण (पी. आर. ओ), सुनिल चव्हाण (फायनान्स मॅनेंजर), अश्रु लाड (एच. आर), युवराज पाटील (मुख्य शेती अधिकारी), सदाशिव गदळे यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थीत होते.
सन २०२५-२६ गळीत हंगामाचे तोडणी वाहतुकीचे करार गुढीपाडव्याच्या शुभ मुहार्तावर चालु करणार असल्याचे मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment