चंदगड : सी एल वृत्तसेवा
कुर्तनवाडी, ता चंदगड गावानजीक बेळगाव- वेंगुर्ले महामार्गावर झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना कुर्तनवाडी गावाच्या कमानी समोर दिनांक २५ मार्च २०२५ रोजी पहाटे ४.१५ च्या सुमारास घडली. जखमींमध्ये एकनाथ धानबा कदम वय २६ (व्यवसाय स्वीट मार्ट दुकान) रा. ढोलगरवाडी व काका देवाप्पा गावडे यांचा समावेश आहे. अपघातानंतर जखमींना बेळगाव येथील विजया हॉस्पिटल अयोध्या नगर बेळगाव येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून याबाबतची फिर्याद जखमी एकनाथ कदम यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी दि २५ रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास यातील जखमी एकनाथ व त्यांचे काका हे चंदगड कडून ढोलगरवाडी कडे जात असताना कुर्तनवाडी कमानीजवळ बेळगाव कडून चंदगड कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या लाल रंगाच्या कारने जोराचे धडक दिली. अपघातानंतर कारचालक न थांबता तसाच सुसाट पुढे गेला. यात दुचाकी चालवणारा एकनाथ व मागे बसलेल्या काका देवाप्पा हे दोघेही गाडीसह उडून रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बेळगाव येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथे एकनाथ कदम यांनी पोलिसांना अपघाताची हकिकत सांगितली. घटनेतील गोवा पासिंग लाल कारच्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम२८१, १२५अ, १२५ब, मोटर वाहन कायदा कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोहेकॉ नाईक अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment