चंदगड / प्रतिनिधी
श्री देव वैजनाथ पतसंस्था पाटणे फाटा – मजरे कार्वे (ता.चंदगड) च्या चेअरमन पदी मनोहर नाईक तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद पवार यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या सभेत करणेत आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार होनगेकर होते.
यावेळी निवडीबद्दल अध्यक्ष मनोहर नाईक व उपाध्यक्ष दयानंद पवार यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देवून सदानंद पाटील व नंदकुमार होनगेकर, शाहू पाटील, बाबुराव वरपे, चंद्रशेखर जोशी, गोपाळ डुरे, पारगड पतसंस्थेच्या चेअरमन मंगल नौकुडकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी नवनिर्वाचित संचालक सचिन तेरणीकर, सागर खाडे, संदीप म्हाडगुत, अविनाश दावणे, उदय पाटील, विठ्ठल पाटील, परशराम नाईक, तुकाराम कांबळे, पुंडलिक कुंभार, उज्वला नाईक, आशावरी बल्लाळ, शकील नाईकवाडी यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते करणेत आला. यावेळी बोलताना शिक्षक संघ (थोरात गट) चंदगड तालुका अध्यक्ष सदानंद पाटील म्हणाले...शिक्षकांच्या आर्थिक विकासाचा कणा शिक्षक पतसंस्था असून सभासदांनी दाखवलेला विश्वास व आपल्याला दिलेले मोलाचे मत यातून आपली जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पेलून अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ व सल्लागार मंडळ सभासदांचा विश्वास निश्चितपणे सार्थ करतील अशी ग्वाही दिली. यावेळी नुतन अध्यक्ष नाईक व उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले की, संचालक मंडळ व सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन सभासदांचे हित व श्री देव वैजनाथ पतसंस्थेची भरभराट यासाठी अत्यंत पारदर्शक व काटकसरीने कारभार करु व सभासदांचे हित साधू तसेच सभासद हेच संस्थेचे मालक असून संपूर्ण संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणूनच कारभार करील अशी ग्वाही दिली.जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष डी. एम. पाटील, नामदेव कोले तसेच सुकाणू समिती सदस्य प्रकाश कडुकर, जकणू पाटील, लक्ष्मण सावंत, भरमू गावडे, उत्तम पाटील, गणपत लोहार यांचेही खूप मोठे योगदान लाभले
यावेळी प्रमुख उपस्थिती मारुती दळवी तसेच संचालक दिपक मनगुतकर, अनंत धोत्रे, पुंडलिक बिर्जे, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती जोशी, सरीता इंगळे, आनंदा जाधव, मऱ्याप्पा कांबळे, दशरथ अतीवाडकर, संभाजी चिंचणगी, महादेव मेगूलकर, रविंद्र गाडीवड्डर, आर.एन.पाटील, सचिन गवळी, अनिकेत म्हैसाळे, रोहीत कांबळे, राजकुमार करडी, सुरज भामरे, पुंडलिक भिकले, सतीश झावरे, हणमंत नाईक, मोहन सुतार, पुंडलिक गुरव तसेच देव वैजनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक पुंडलिक पाटील व नलिनी नौकुडकर यांचाही सत्कार शाल, पुष्प देवून करणेत आला. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुजावर व गोसावी यांनी कामकाज पाहीले.आभार महेश जांबोटकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment