ढोलगरवाडी तील सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी ९ फूट लांबीच्या दोन सापांना दिले जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2025

ढोलगरवाडी तील सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी ९ फूट लांबीच्या दोन सापांना दिले जीवदान



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर ढोलगरवाडी यांचे सुपुत्र सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी आज दि. ७ मार्च २०२५ रोजी तब्बल ९ फूट लांबीच्या धामण जातीच्या दोन सापांना एकाच वेळी जीवदान दिले. 
    ढोलगरवाडी (ता. चंदगड)  पुंडलिक सप्ताळे यांच्या पोल्ट्री समोर रात्री साडेआठच्या सुमारास सुमारे ९ फुट लांबीचे धामण जातीचे दोन बिनविषारी साप काही नागरिकांना दिसले. एकत्र गुरफटलेल्या या सापांना मारण्यासाठी काही जण सरसावले होते. तथापि यावेळी काहींनी गावातीलच सर्पमित्र संदीप टक्केकर यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. काही मिनिटात संदीप यांनी घटनास्थळी येऊन जमलेल्या ग्रामस्थांना हे साप धामण जातीचे असून बिनविषारी आहेत. त्यांचा मिलन काळ सुरू असल्याने ते एकत्र गुरफटले आहेत असे सांगून थांबवले. हे मिलन सुमारे २० मिनिटे सुरू होते. ते संपल्यानंतर संदीप यांनी दोन्ही सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.  या कामी त्यांना शेतकरी पांडुरंग भरमाना पाटील, सर्पमित्र अर्जुन टक्केकर, सर्पमित्र रोहित पाटील, सर्पमित्र महादेव पाटील, तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक परशराम पाटील, मधुकर पाटील आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment