कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवाशी संघामार्फत ९ रोजी 'गौरव कोल्हापूरकरांचा' कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2025

कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवाशी संघामार्फत ९ रोजी 'गौरव कोल्हापूरकरांचा' कार्यक्रमाचे आयोजन

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्ताने पनवेल शहरात राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी नागरिकांनी 'कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवासी संघ' स्थापन केला आहे. गेली अनेक वर्षे या संघामार्फत समाज उपयोगी अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. त्याच पद्धतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल रहिवासी संघाने ९ मार्च रोजी 'कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

      रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री वृंदावन बाबा आश्रम हॉल, गुरुद्वाराच्या पाठीमागे नवीन पनवेल येथे पार पडणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे, पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, लावणी सम्राज्ञी माया जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने कोल्हापूर भूषण तसेच राष्ट्रीय एकता गौरव पुरस्कार प्राप्त समाजसेवक बी. व्ही. गाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment