कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम' सप्ताहाची मंगळवारी समाप्ती - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2025

कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम' सप्ताहाची मंगळवारी समाप्ती

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा अखंड नाम सप्ताह मंगळवार दि. ४ मार्च २०२५ रोजी प्रारंभ झाला असून सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहाची समाप्ती मंगळवार दिनांक ११ रोजी होणार आहे.
   यंदा सप्ताहाचे अखंड ९६ वे वर्ष असून श्री शंकर भोलेनाथ च्या मंदिरातील 'सांब सदाशिव सांब, हर हर सांब सदाशिव सांब' च्या अखंड गजरात होणारा अशा प्रकारचा हा संपूर्ण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील एकमेव सप्ताह मानला जातो. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीच्या सूर्योदयाला प्रारंभ होऊन फाल्गुन शुद्ध द्वादशी च्या सूर्योदयाला समाप्ती होते. यंदा हा सप्ताह ४ ते ११ मार्च असा साजरा होत आहे. सप्ताह काळात सकाळपासून भजन, दुपारी ४ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ प्रवचन, ९ नऊ ते १२ किर्तन व  पहाटे ५ पर्यंत जागर भजन हे कार्यक्रम सुरू असतात. यंदा  कीर्तनकार हभप. अभिजीत देशमुख आळंदी, हभप विश्वंभर कदम आळंदी, भागवताचार्य अशोक तळेकर परभणी, हभप वैजनाथ डोंगरे आळंदी यांची कीर्तने आयोजित केली आहेत. नवसाचा मुलांचे वजन करण्याचा कार्यक्रम सोमवारी दिवसभर असून मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी रात्री १० वाजता  सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भावेश्वरी मंडळ हडलगे (ता गडहिंग्लज) यांचे सोंगी भारुडी भजन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो

ग्रामदैवत श्री कलमेश्वर

No comments:

Post a Comment