ढोलगरवाडी जवळ हांज ओहोळ नदीत बुडून एकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2025

ढोलगरवाडी जवळ हांज ओहोळ नदीत बुडून एकाचा मृत्यू

 

मारुती भीमसेन राजहंस उर्फ मारुती भोमाना लोहार

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      ढोलगरवाडी (ता. चंदगड) गावाजवळून वाहणाऱ्या हांज ओहोळ नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. ५ मार्च २०२५ रोजी दुपारी दोन पूर्वी घडली. मारुती भीमसेन राजहंस उर्फ मारुती भोमाना लोहार (वय ५८, राहणार ढोलगरवाडी) असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची वर्दी त्याचा चुलत भाऊ शंकर कृष्णा लोहार (रा. ढोलगरवाडी) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.

  मारुती हा ढोलगरवाडी ते गौळवाडी मार्गावर असणाऱ्या बंधाऱ्याच्या वरील बाजूस नदीत हात पाय धुण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरून नदीपात्रात पडून बुडाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयत मारुतीच्या पश्चात पत्नी आहे. घटनेची नोंद दि ६ रोजी बीएनएसएस १९४ प्रमाणे आकस्मिक मयत म्हणून करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ जमील मकानदार हे करत आहे.

No comments:

Post a Comment