मराठा महासंघाच्या महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रिया जांभळे - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2025

मराठा महासंघाच्या महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रिया जांभळे

प्रिया जांभळे

चंदगड : सी एल वृत्तसेवा
    राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला आघाडी उपाध्यक्षपदी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावची लेक तथा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रिया बबनराव जांभळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रिया जांभळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. अलीकडच्या काळात सातत्याने महापुरुषांचे होणारे अपमान थांबवणे, अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या समाजकंटकांना विरोध करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी धडपडणाऱ्या प्रिया जांभळे यांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषीराज टकले- पाटील यांनी त्यांना या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान केले. मराठा समाजाशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवशंभू प्रिया बबनराव  जांभळे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
निवड पत्र प्रदान प्रसंगी डॉ. कृषीराज टकले, निलेश धुमाळ, शारदा पाटील, अनिता पाटील, अलका हरगुडे, ज्योती सातव, मीरा शिंदे, अश्विनी सावंत, वैशाली भैरट, सविता थोरात प्रतिभा, सीता पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आष्टी येथील कार्यक्रमात बोलताना जोपर्यंत श्वास आहे; तोपर्यंत छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी, स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचे प्रिया जांभळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment