चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये शनिवार दि. २२ मार्च रोजी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये गोवा औद्योगिक क्षेत्र वेरना वरणा इंडस्ट्रियल इस्टेट मधील दूरसंचार कंपनीमध्ये विविध 200 रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे. सदर मेळाव्यासाठी बारावी पास, आयटीआय, वेगवेगळे ट्रेड, डिप्लोमा, बीसीए, बीए, बीकॉम, विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी तीन पर्यंत उपस्थित राहून लाभ घ्यावा. तरी गरजू व पात्र पुरुष उमेदवारांनी उपस्थित राहून सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल व समन्वयक डॉ. राजेंद्रकुमार साळुंखे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment